बनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर

पुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.

अंतर : पुण्यापासून 40 कि.मी., साताऱ्याहून 80 कि.मी.

बनेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार | A photo by kokanbhatkanti

बनेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार | A photo by kokanbhatkanti

एकदिवसाच्या ट्रीपसाठी हे ठीकाण प्रसिद्ध असून, तरूण-तरूणींमध्ये वीकेंड स्पॉट म्हणूनही आवडते आहे.

हे मंदिर प्राचिन असून नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधले आहे. 1739 पासून चिमाजी अप्पांनी पोर्तुगिझांना हरवल्यानंतर विजयाची खुण म्हणून आणलेली चर्चची घंटा येथे बांधलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातूम आत आल्यावर आपणांस मुख्य मंदिर, दिपमाळ, दोन छोटे कुंड दिसून येतात. या मंदिरांमध्ये तुम्हाला महादेवाच्या पिंडीबरोबरच लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मुर्तीही आहेत. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे गुप्तलिंग. येथे गर्भगृहात असणाऱया मुख्य पिंडीखालीच आपणास पाच शिवलींगे दृष्टीस पडतील.

या मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या बनाचे रूपांतर सुंदर अशा बगिच्यात केलेले असून त्याच्या आजूबाजूने सिमेंटच्या ब्लॉक्सने पायवाटा काढल्या आहेत. त्याचप्रमाणे य़ेथे रोपवाटीका असून त्यामध्ये आपणांस अनेक उपयोगी झाडे, तसेच सुंदर फुलांची झाडे विकत मिळू शकतील. या बनामध्ये आपण वेगवेगळे पक्षी बघू शकता. या बनाच्या मागच्या बाजूस नदी असून त्यापासून निघणारा धबधबा हा पावसाळ्यातील एक आकर्षण आहे. मात्र, येथील धबधब्यामध्ये उतरणे धोक्याचे असून तशी सुचना ही येथे आहे. त्यामुळे याचे रौद्र रूप लांबून बघणेच उत्तम !!

बनेश्वर मंदिरला कसं जाल?

पुणे किंवा मुंबईहून बनेश्वरला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे-सातारा महामार्गावरून नसरापूरमार्गे बनेश्वरला पोहोचता येऊ शकते. रेल्वेने येत असल्यास पुणे हे जवळचे रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळ आहे. जवळील विमानतळ पुणे आहे. पुण्यापासूनपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने बनेशवरला येऊ शकता.