समुद्रकिनारे
किल्ले
धार्मिक स्थळे
अभयारण्ये
ट्रेकींग
निसर्ग सौदर्य
वारसा स्थळे
साहसी खेळ
आकर्षणे
अॅग्रो टुरिझम
अध्यात्मिक ठीकाणे
४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा
गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.
सर्वात लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं ठिकाण
चिपळूणपासून चाळीस किलोमीटर अंतरावर वसिष्ठी नदी आणि जयगड खाडीच्यामध्ये गुहागर वसलंय. एकेकाळी फारसं कोणाला माहित नसलेलं गुहागर आता कोकणातलं एक popular destination बनत आहे.
दापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी
रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.
एकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.
विलोभनीय बौद्धमुर्ती असणारा प्राचीन बौद्धकालीन लेण्यांचा समूह
औरंगाबाद म्हटलं की अजंठा लेणी, वेरूळ लेणी यांची हमखास आठवण येते. मात्र, याच औरंगाबादमध्ये थोडीशी कमी प्रसिद्ध असणारा अजून एक लेण्यांचा समूह आहे जो औरंगाबाद लेणी या नावाने ओळखला जातो. ताजमहालची प्रतिकृती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या औरंगाबादच्या बीबी का मकबरा या प्रसिद्ध ठिकाणापासून केवळ २-३ कि.मी अंतरावर ही बौद्ध लेणी वसलेली आहेत.
शक्तीशाली राजवटींचे केंद्र असणारा शक्तीशाली किल्ला
औरंगाबाद म्हटलं की लोकांना अजंठा, वेरूळची लेणी आठवतात. औरंगाबादमध्ये या लेण्यांशिवाय बघण्याकरिता अजूनही काही पर्यटनस्थळे आहेत. त्यातील सर्वात प्रामुख्याने नाव घेता येईल ते ठीकाण म्हणजे देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला. दगडांमधून तयार केलेले रस्ते आणि गुहा, मंदिरं, खंदक, संरक्षक तटबंद्या, मोटी, शाही महल आणि हम्मामखाने, निवासी घरे, बाजार, विहीरी आणि टाके याने परिपुर्ण असा किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला.
अनेक राजवटी बघणारा विदर्भातील ऐतिहासिक किल्ला
डोंगराळ किल्ला आणि बरोबरीला सभोवतीला वन्यजीव असं दृष्य महाराष्ट्रात फारच कमी ठीकाणी दिसतं. नरनाळा किल्ला हा अशाच दुर्मिळ कॉम्बिनेशनचा एक हिस्सा आहे. मेळघाट प्रकल्प आणि त्याच्या मध्ये पुरातत्व विभागाची संरक्षित वास्तू असणार भव्य आणि कठीण असा नरनाळा किल्ला हे एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र बनलं नसेल तर नवल.
श्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच
रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे.
300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला
भर समुद्रात रौद्र लाटांना तोंड देत उभा असणारा एक अद्वितीय आणि एकमेव अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे मुरूड जंजीरा. रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ समुद्रात असणारा हा किल्ला पुणे आणि मुंबई पासून साधारण १८० कि.मी. अंतरावर आहे.
महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.
चमचमणाऱया वाळूने सजलेला सुंदर समुद्रकिनारा
अलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून 30 कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
कुटुंबासहीत सुट्टी साजरी करण्याचे उत्तम ठिकाण
रायगड जिल्ह्यात वसलेले श्रीवर्धन हे पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या काही ठिकाणांपैकी एक आहे. श्रीवर्धनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आहेत.
शंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....
मुरूड जंजिऱ्याला आव्हान देणारा किल्ला
किल्ले पद्मदुर्ग हा स्थानिकांना कासा किल्ला या नावाने माहित आहे. समुद्रामध्ये असणारे जे मोजके 5-6 किल्ले आहेत त्यापैकी एक पद्मदुर्ग. मुरूडमधील सिद्दींच्या मुरूड जंजीऱ्याला शह देण्यासाठी आणि सिद्दींवर आपला वचक रहावा यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.
शिवशंकराचे प्राचिन देवस्थान
पुणे जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थाने वसलेली आहेत. यामध्ये बरिचशी शंकराची देवस्थाने असून ती ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. प्राचीन देवस्थाने असुनही सुस्थितीत आणि फारशी माहित नसणारी जी ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पांडेश्वर (Pandeshwar) येथील महादेवाचे मंदिर.
पुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती
पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर असणाऱया शिरूर तालुक्यात असणारे रांजणगाव अष्टविनायकांमधील महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे. या गणपतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये गणेशोत्सवाच्या काळात घरामध्ये गणपतीची स्थापना करत नाहीत. या मंदिराच्या इतिहासानुसार हे मंदिर नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधले गेलेले आहे.
श्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारा सिद्धीविनायक हा अहमदनगर येथील सिद्धटेक (Siddhatek) येथे वसलेला आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा असणारा हा एकमेव गणपती आहे. प्राचीन कथेप्रमाणे श्रीविष्णूने मधु व कैटभ राक्षसांना मारण्यापुर्वी या गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली होती.
नरवीर तानाजीच्या पराक्रमाचा जागता साक्षीदार
ट्रेकींगसाठी पुण्याच्या जवळपास कोणतं ठिकाण आहे असं पुण्यात कोणाला विचारलं तर किल्ले सिंहगड (Sinhagad Fort) हे नाव कोणीही सहज सांगेल. पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर असणारा एकेकाळी कोंढाणा नावाने माहित असणारा हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झाला आणि सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला.
निसर्ग सौंदर्य
साताऱ्याजवळील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण
महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे सातारा जिल्ह्यातील छोटे शहर असून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटांमध्ये वसलेले हे ठिकाण ब्रिटीशांनी आपली उन्हाळ्यातील राजधानी म्हणून निवडलेले होते.
शिल्पकलेचा अद्भूत प्राचिन वारसा
भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात वैविध्यपुर्ण अशा लेणी आहेत. अतिप्राचीन संपुर्ण पहाडात कोरलेली ही लेणी बघताना त्यावेळेच्या शिल्पकलेस आणि आर्किटेक्चरला दाद द्यावीशी वाटते.
भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर
'दक्षिण काशी'अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.
यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर
पुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.
बनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर
पुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.