श्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच

रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे.

अंतर :

दिवेआगर येथील गणेश मंदिर | A photo by Kokan Bhatkanti

दिवेआगर येथील गणेश मंदिर | A photo by Kokan Bhatkanti

काही वर्षापुर्वी सापडलेल्या सुवर्ण गणेशाच्या मंदिरामुळे दिवेआगर प्रकाशात आले आणि इथे भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होऊ लागली. फारशी लोकवस्ती नसणाऱ्या दिवेआगरला नारळी-सुपारीची झाडी, सुंदर बीच, जुनी मंदिरे असा समृद्ध कोकणी वारसा लाभला आहे असं म्हणायला हरकत नाही.

पुणे- मुंबईपासून सुमारे 170 कि.मी. अंतरावर असणाऱ्या दिवेआगरला 5 कि.मी. लांबीचा रूपेरी वाळू असणारा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रकाशाचं भांडार असणारं गाव असा दिवेआगर चा अर्थ आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगर हे एकाच पट्ट्यात असणारे तीन समुद्रकिनारे. समुद्रकिनाऱ्याने जाणारे रस्ते आपल्याला थेट दिवेआगरला घेऊन येतात.

केवळ समुद्रकिनाराच नव्हे तर येथील रूपनारायणाचे मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. ब्रह्मा आणि महेशाच्या मुर्तींबरोबरच भगवान विष्णूच्या दशावतारांचे कोरलेल्या मुर्त्या ह्या देखील आकर्षरृक आहेत. या मंदिरामध्ये असणारी केशवाची मुख्य मुर्ती 900 वर्षे जुनी म्हणजे 12व्या शतकात कोरलेली आहे असं सांगितलं जातं. रूपनारायण मंदिराबरोबरच उत्तरेश्वर महादेवाचे मंदिरही बघण्यासारखं आहे. याचबरोबर, ज्या गणेशाच्या मुर्तीमुळे दिवेआगर प्रसिद्धीच्या झोतात आलं ते सुवर्णगणेशाचं मंदिरही बघण्यासारखं आहे. अर्थात, काही काळापुर्वी या मंदिरावर दरोडा घालून गणेशाची सुवर्ण मुर्ती पळवली गेली. त्यामुळे येथे त्या मुर्तीचा फोटो दर्शनासाठी ठेवलेला आहे.

दिवेआगरला कसं जाल?