- CITY : अहमदनगर
- CATEGORY : घरगुती व्यवस्था
महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजलं जाणारं कळसूबाई शिखर सर करणं हे महाराष्ट्रातल्या अनेक ट्रेकर्सचं स्वप्न असतं. अकोले जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर ट्रेकींग करणं किंवा त्या परिसरात कँपिंग करणं हा एक वेगळा आनंद देणारा अनुभव आहे. हाच आनंद देणारा अनुभव दशरथ आणि तानाजी खाडे बंधूंच्या बारी-जहागिरदारवाडी येथे कळसुबाई माची मंदिर शेजारी 'हॉटेल सह्याद्री कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग' येथे मिळतो.
बारी गाव ते कळसूबाई शिखरापर्यंतच्या पायवाटेचं मार्गदर्शन असो वा कळसुबाई शिखराची माहिती देणाऱ्या गाईडची सोय असो, खाडे बंधू तुमच्या दिमतीला हजर आहेत. कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग तुम्हाला खालील सुविधा देतात.
ट्रेकिंग - कळसुबाई शिखर ट्रेकिंग (महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर)
गाईड - बारी गाव ते कळसुबाई शिखर पायवाट मार्गदर्शन, कळसुबाई शिखर इतिहास, कळसुबाई देवीची माहिती, भोगोलिक माहिती, प्राकृतिक माहिती, नसर्गिक वनस्पतीची नावे/माहिती इ. माहिती या गाईडकडून दिली जाते.
कॅम्पिंग- टेंट्स सर्व्हिस, कॅम्पिंग, कॅम्पफायर, म्युझिक, एक वेळेस अनलिमिटेड व्हेज / नॉनव्हेज जेवण, ब्रेकफास्ट दोन वेळेस, आंघोळीला गरम पाणी, बाथरूम, वॉशरूम इत्यादी सुविधा कँपिंगसाठी उपलब्ध आहेत.
नाष्टा आणि जेवणाच्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत:
ब्रेकफास्ट - स्पेशल गवती चहा, कांदा पोहे
व्हेज जेवण- अनलिमिटेड पातळ भाजी, सुखी भाजी, चपाती / भाकरी, सडीचा भात, लोणचं, पापड, लिंबू , कांदा
नॉनव्हेज जेवण- अनलिमिटेड गावरान चिकन (काळा मसाला पाट्यावरचा), हात सडीचा भात, भाकरी / चपाती, कांदा, लिंबू
तरी कळसूबाई शिखराचा प्लॅन बनवत असाल तर हॉटेल सह्याद्रीच्या खाडे बंधूच्या आदरातिथ्याचा नक्की लाभ घ्या.
संपर्क-
दशरथ खाडे - 8975565613
तानाजी खाडे - 9765640983
पत्ता -
हॉटेल सह्याद्री कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग,
कळसुबाई माची मंदिर शेजारी,
बारी-जहागिरदारवाडी ता.-अकोले, जिल्हा-अहमदनगर
महाराष्ट्र पिन-422604