सामंत बीच रिसॉर्ट

भोगवे बीचजवळील एक सुंदर रिसॉर्ट

भोगवे हे वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणारं गाव. याच भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे 'सामंत बीच रिसॉर्ट' (Samant Beach Resort). एक सुंदर गाव आणि पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी आपल्या राहण्याची सर्वोत्तम सोय करणाऱ्या या रिसॉर्टमध्ये आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक लक्ष देणारे, अत्यंत आरामदायक, सर्व सुविधांनीयुक्त अशी राहण्याचे रिसॉर्ट आपण पहात असाल तर सामंत बीच रिसॉर्ट (Samant Beach Resort) आपल्याला सर्वोत्तम पर्याय आहे.

सामंत रिसॉर्टमध्ये एकुण पाच रूम्स असून वरच्या मजल्यावरील रूममधून थेट फेसाळणाऱ्या समुद्राचे सुंदर दर्शन होते. सगळ्या आरामदायक सोयीसुविधा पुरवणाऱ्या या रुम्स साधारणपणे 3000 ते 3500 रुपये प्रतिदिवस एवढ्या माफक चार्जेसपासून उपलब्ध आहेत. यामध्ये चहा-कॉफी कॉम्प्लिमेंटरी दिली जाते.

केवळ राहण्याचीच नव्हे तर खाण्या-पिण्याची देखील उत्तम सोय सामंत रिसॉर्टमध्ये आहे. आपल्या आवडीनुसार अस्सल मालवणी शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय इथे केलेली आहे. इथल्या मालवणी पद्धतीच्या माशांची चव तर एकदा तरी घ्यायलाच हवी.

आमची खासियत :

 • संपुर्ण लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त रूम्स
 • सगळ्या रूम्समध्ये ए.सी.
 • नाष्ट्याची सोय
 • गीझर, टी मेकर, इस्त्रीची सोय
 • सॅटेलाईट टेलिव्हीजन
 • इन्व्हर्टर बॅकअप
 • फ्री पार्कींग
 • शुद्ध मालवणी आदरातिथ्य
 • प्रत्येक रूममधून समुद्राचे दर्शन
 • नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स
 • नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण
 • स्वच्छ आणि हिरवागार परिसर
 • समुद्रकिनाऱ्यापासून दोन मिनीटाचे अंतर

स्थानिक आकर्षणे:

 • वॉटर स्पोर्ट्स
 • जंगल सफारी
 • ट्रेकींग
 • निवतीचा किल्ला
 • डॉल्फीन सफारी
 • दीपस्तंभाची सफारी
 • स्थानिक नाटकं (दशावतारी)
 • आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर
Advertise With Us
Advertise With Us