माझी भटकंती : आपला अनुभव

भटकणं हा आमच्यासारखाच अनेकांचा आवडता छंद असेल याची आम्हाला खात्री आहे. आपण अनेक ठिकाणी फिरतो. काही जणांना समुद्रकिनारे आवडतात तर काही जणांना गड-किल्ले खुणावतात. काही जणांना खोल जंगलात फिरायला अावडतं तर काही जणांना प्राचीन लेणी अभ्यासायला आवडतात. काही जण नवीन नवी जागा शोघत असतात.

आपले अनुभव आपल्याला इतरांबरोबरही शेअर करता आले तर आनंदच आहे, नाही का? आपल्या अनुभवातून आपल्याला आलेलं शहाणपण इतरांबरोबर शेअर होईल आणि त्यातून अशा ठिकाणी न गेलेल्यांना आपलं नियोजन करण्यास मदतही होईल. आपल्या फसलेल्या ट्रीप्स किंवा आपल्याला सापडलेलं नवीन ठिकाण अशा अनेक गोष्टी आपल्या मनाच्या कप्प्यात दडलेल्या असतील.

आपल्या याच गुपितांची पोटली खोला, हा कप्पा हळुवार उघडा आणि आपले भटकंतीेचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. त्यासाठी आपली भटकंती आम्हाला पाठवा kokan.bhatkanti@gmail.com वर...

आपल्या रिस्पॉँसची वाट बघत आहोत.