दिवेआगर : श्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच

Listing has verified and belong the business owner or manager.
0 (0 reviews)
समुद्रकिनारे हिंदू मंदिरे

रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे. काही वर्षापुर्वी सापडलेल्या सुवर्ण गणेशाच्या मंदिरामुळे दिवेआगर प्रकाशात आले आणि इथे भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होऊ लागली. फारशी लोकवस्ती नसणाऱ्या दिवेआगरला नारळी-सुपारीची झाडी, सुंदर बीच, जुनी मंदिरे असा समृद्ध कोकणी वारसा लाभला आहे असं म्हणायला हरकत नाही.

पुणे- मुंबईपासून सुमारे 170 कि.मी. अंतरावर असणाऱ्या दिवेआगरला 5 कि.मी. लांबीचा रूपेरी वाळू असणारा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रकाशाचं भांडार असणारं गाव असा दिवेआगर चा अर्थ आहे.

श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगर हे एकाच पट्ट्यात असणारे तीन समुद्रकिनारे.

समुद्रकिनाऱ्याने जाणारे रस्ते आपल्याला थेट दिवेआगरला (Diveagar) घेऊन येतात. केवळ समुद्रकिनाराच नव्हे तर येथील रूपनारायणाचे मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. ब्रह्मा आणि महेशाच्या मुर्तींबरोबरच भगवान विष्णूच्या दशावतारांचे कोरलेल्या मुर्त्या ह्या देखील आकर्षरृक आहेत. या मंदिरामध्ये असणारी केशवाची मुख्य मुर्ती 900 वर्षे जुनी म्हणजे 12व्या शतकात कोरलेली आहे असं सांगितलं जातं. रूपनारायण मंदिराबरोबरच उत्तरेश्वर महादेवाचे मंदिरही बघण्यासारखं आहे. याचबरोबर, ज्या गणेशाच्या मुर्तीमुळे दिवेआगर (Diveagar) प्रसिद्धीच्या झोतात आलं ते सुवर्णगणेशाचं मंदिरही बघण्यासारखं आहे. अर्थात, काही काळापुर्वी या मंदिरावर दरोडा घालून गणेशाची सुवर्ण मुर्ती पळवली गेली. त्यामुळे येथे त्या मुर्तीचा फोटो दर्शनासाठी ठेवलेला आहे.

दिवेआगरला राहण्याची आणि खाण्यापिण्याच्या सेवा देखील व्यवस्थित उपलब्ध आहेत.

आपल्या बजेटनुसार आपण घरगुती निवासापासून चांगल्या रिसॉर्टपर्यंत राहण्याची व्यवस्था बघू शकता. त्याचप्रमाणे, आपणांस शुद्ध शाकाहारी, मांसाहारी आणि अर्थात मत्स्याहारी जेवणाची सोयदेखील आहे. कोकणात जाणारे बहुतांशी पर्यटक खास मासे खाण्यासाठी जात असल्याने येथे खास कोकणी पद्धतीचे जेवण बनवून घालणारे घरगुती हॉटेल्स देखील आहेत. येथील पंजाबी आणि चायनीज मात्र आम्हाला ठीकठीक वाटले.

त्यामुळे वीकेंडची ट्रीप मग ती आपल्या मित्रांसोबत असो वा कुटुंबीयांसोबत, दिवेआगरला एकदा तरी अवश्य भेट द्या.

Contact

FAQ's

दिवेआगरला कसं जाल?

पुणे किंवा मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे- मुंबई महामार्गावरून खोपोली-पेण मार्गे अलिबागला पोहोचता येऊ शकते. रेल्वेने येत असल्यास पेण हे जवळचे रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळ आहे. पेणपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला येऊ शकता. थोडक्यात, एकदिवसीय ट्रीपसाठी सर्वोत्तम ठिकाण तुम्ही बघत असाल तर अलिबागला (Alibaug) नक्की भेट द्या.

जवळील भेट देण्याची इतर ठिकाणे:

श्रीवर्धन : कुटुंबासहीत सुट्टी साजरी करण्याचे उत्तम ठिकाण हरिहरेश्वर : महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद पाली : बल्लाळेश्वर गणेशाचे प्राचिन मंदिर

What is Nearby?

Agent

Send a message

Review

0 Base on 0 Reviews

Reply

Cancel reply