हरिहरेश्वर : महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद

Listing has verified and belong the business owner or manager.
0 (0 reviews)
समुद्रकिनारे हिंदू मंदिरे

रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर (Harihareshwar) येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान आहे. म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.

एका बाजूला समुद्र, दुसऱया बाजूला मंदिर, मंदिराच्या मागच्या बाजूने असणाऱया डोंगरातून खाली समुद्राच्या दिशेने उतरणारा रस्ता, आणि एकीकडे बाणकोट खाडी…

श्रीवर्धनप्रमाणेच हरिहरेश्वर देखील निसर्गरम्य आहे.

नैसर्गिक मऊ पांढरी वाळू, सभोवताली असणारी सुरूची वने हे इथले वैशिष्ट्य. येथील महादेवाचे मंदिर पेशव्यांचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे रमाबाईं आणि त्यांच्या बरोबरीन पेशव्यांचे घराणे येथे भेट देत असल्याच्या नोंदी आहेत.

येथील महादेव मंदिरामागे टेकडीवरून तुम्हाला खाली उतरता येते. या टेकडीच्या मधोमध खाली पायऱयांनी उतरत जाणारा रस्ता तुम्हाला थेट समुद्रकिनारी आणतो.

मात्र येथे पाण्यात जाण्यापुर्वी ग्रामस्थांकडून भरती ओहोटीच्या तसेच संभाव्य धोक्याच्या सुचना नक्कीच घ्या. येथील समुद्र हा तसा शांत असला तरी येथे पाण्यात उतरणे धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जवळच बाणकोट खाडी असल्याने ओहोटी पाणी खेचणारी असते.

Contact

FAQ's

What is Nearby?

Agent

Send a message

Review

0 Base on 0 Reviews

Reply

Cancel reply