- CITY : रत्नागिरी
- CATEGORY : समुद्रकिनारे
मुरूडच्या किनारा हा रत्नागिरीमधील खास वीकेंड स्पॉट आहे. पुणे आणि मुंबई येथून तुलनेने फार अंतर नसल्याने दोन-तीन दिवसांची सुट्टी घालविण्याचे ठीकाण म्हणून पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. येथे समुद्रात खेळण्याची मजा अनुभवण्याबरोबरच वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलींग, बैलगाडीच्या चकरा, एटीव्ही रायडींग असे अनेक साहसी क्रीडाप्रकार येथे आहेत. त्याचप्रमाणे इथल्या समुद्रात डॉल्फीन्स ही दिसत असल्याने बोटीतून खोल समुद्रात जाऊन डॉल्फीन्सना उड्या मारताना बघण्याचा आनंद ही घेता येतो. त्याच बरोबर समुद्रगरूड, सीगल्स असे पक्षीही तुम्हाला येथे पहायला मिळतील.
मुरूडच्या मुख्य रस्त्यावरच अठराव्या शतकात बांधलेले दुर्गा मातेचे मंदिर आहे. लाकडी खांब असणाऱया या मंदिराची उभारणी वाखाणण्याजोगी आहे. या मंदिराच्या मागे एक तळे देखील आहे. या मंदीराच्या प्रवेशालाच डाव्या बाजूला एक घंटा बांधलेली आहे. असे सांगितले जाते की चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर तिथल्या एक चर्चमधून ती घंटा आणून येथे बांधली आहे.
इथे समुद्रकिनाऱयाला लागूनच अनेक बीच रिसॉर्ट आहेत. त्याचप्रमाणे समुद्रापासून थोड्या लांब अंतरावर अनेक लॉजेसही आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपण येथे राहण्याची व्यवस्था बघू शकता. येथून जवळच असणाऱया हर्णे बंदरातून ताजी मासळी आणून ती खाण्याची मजाही काही औरच.... !!!