Dapoli

मुरूड बीच : दापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.