Daulat Mangal gad

भुलेश्वर मंदिर : यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर

पुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच  प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.