Hiroji Indulkar

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी

रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.