Kasa Fort

किल्ले पद्मदुर्ग : मुरूड जंजिऱ्याला आव्हान देणारा किल्ला

किल्ले पद्मदुर्ग हा स्थानिकांना कासा किल्ला या नावाने माहित आहे. समुद्रामध्ये असणारे जे मोजके 5-6 किल्ले आहेत त्यापैकी एक पद्मदुर्ग. मुरूडमधील सिद्दींच्या मुरूड जंजीऱ्याला शह देण्यासाठी आणि सिद्दींवर आपला वचक रहावा यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.