Kondhana Fort

किल्ले सिंहगड : नरवीर तानाजीच्या पराक्रमाचा जागता साक्षीदार

ट्रेकींगसाठी पुण्याच्या जवळपास कोणतं ठिकाण आहे असं पुण्यात कोणाला विचारलं तर किल्ले सिंहगड (Sinhagad Fort) हे नाव कोणीही सहज सांगेल. पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर असणारा एकेकाळी कोंढाणा नावाने माहित असणारा हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झाला आणि सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला.