बनेश्वर मंदिर : बनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर
पुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.