Siddhivinayak

सिद्धटेक गणेश मंदिर : श्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारा सिद्धीविनायक हा अहमदनगर येथील सिद्धटेक (Siddhatek) येथे वसलेला आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा असणारा हा एकमेव गणपती आहे. प्राचीन कथेप्रमाणे श्रीविष्णूने मधु व कैटभ राक्षसांना मारण्यापुर्वी या गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली होती.