Temples in Konkan

गणपतीपुळे : ४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा

गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.

वेळणेश्वर : शंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....

हरिहरेश्वर : महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद

रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान  हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.