मार्ग स्पष्ट करतो
एखाद्या ठिकाणी कसं जायचं, कशा पद्धतीने प्रवास करायचा आणि शेवटच्या क्षणी प्लॅन झाला तरी काय लक्षात ठेवायचं.
कोकण भटकंती ही फक्त पर्यटन स्थळांची यादी नाही. कोकणात फिरताना उपयोगी पडणारी, जमिनीवरची आणि प्रवाशांच्या नजरेतून मांडलेली माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

प्लॅनिंग सोपं, प्रवास निवांत, आणि कोकणाचा अनुभव शक्य तितका अस्सल.

कोकण भटकंतीच्या साईटवर आपले स्वागत आहे. रायगडपासून सिंधूदुर्गपर्यंत पसरलेला अथांग सागर आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्यामुळे कोकण पर्यटकांना कायमच खुणवत असतो. निसर्गाने नटलेल्या कोकणाचं वैभव म्हणजे नारळी-पोफळीची झाडं, सोन्यासारखी वाळू असणारे समुद्रकिनारे, उंचचउंच आणि रौद्र धबधबे, प्राचिन देवस्थाने, हिरवेगार डोंगर-दऱया आणि तशीच साधी सुधी माणसं.
कोकणाच्या याच रूपाला आम्ही भुललो आहोत. भटकणं हा आमचा स्थायी भाव आहे. आम्ही जरी पुण्याचे असलो तरी पुण्याबाहेरची ठिकाणं माहीत करून घेणं आणि तिथे भटकंती करणं हे आमचं एक व्यसन बनलंय. आपल्या सभोवताली फिरण्यासारखी इतकी ठिकाणं आहेत की त्यापैकी बरीचशी आपल्याला माहीतही नसतात. आणि कोठेही फिरताना येणारे अनपेक्षित अनुभव आणि अमर्याद मजा आपल्याला अशी भटकंती पुन्हा पुन्हा करण्यास प्रेरीत करते.
एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर तिथे कसं जायचं, कशा पद्धतीने प्रवास करायचा, तिथे बघण्यासारखं काय काय असेल, तिथे खाण्या-पिण्याची आणि गरज पडल्यास राहण्याची सोय असेल का, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही एकत्र देण्याचा प्रयत्न करतो.
एखाद्या ठिकाणी कसं जायचं, कशा पद्धतीने प्रवास करायचा आणि शेवटच्या क्षणी प्लॅन झाला तरी काय लक्षात ठेवायचं.
समुद्रकिनारे, किल्ले, देवस्थाने, गावं आणि निसर्गरम्य जागा फक्त नावापुरत्या नाहीत, तर संदर्भासह.
तिथे खाण्या-पिण्याची, गरज पडल्यास राहण्याची सोय असेल का, याची माहिती प्रवासात फार उपयोगी पडते.
वाचकांनी पाठवलेले अनुभव इतर प्रवाशांच्या नियोजनाला दिशा देऊ शकतात.
कोकण भटकंती तुम्हाला आवश्यक असणारी ही सर्व माहिती आपल्या साईटवर ठेवणार आहे. तुमची भटकंती विनासायास आणि विनाअडथळा पार पडावी, अगदी शेवटच्या क्षणाची ठरली तरी, हा यामागचा हेतू आहे.
आणि हो, केवळ आम्हीच नाही तर तुम्ही देखील तुमचे भटकंतीचे अनुभव आमच्या बरोबर शेअर करावेत असं आम्हाला वाटतं. कारण, तुमचा अनुभव इतरांना त्यांचं प्लॅनींग करताना मदत करू शकेल आणि त्यावरून आम्ही आमचीही माहिती अजून व्यवस्थितपणे मांडू शकू.
कोकण समजून घेतल्याशिवाय कोकणातली भटकंती पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे पर्यटनासोबत हवामान, खाद्यसंस्कृती, लोकजीवन आणि ऋतू यांनाही जागा आहे.
एका बाजूला अफाट समुद्रकिनारा आणि दुसरीकडे अभेद्य सह्याद्रीच्या कातळ डोंगररांगा.
समुद्र शांत, हवा तुलनेने थंड आणि भटकंतीसाठी सोयीची.
मासे, मसाले, आंबट-तिखट चवी आणि घरगुती जेवणाचा अस्सल अनुभव.
सण, जत्रा, गणेशोत्सव, शिमगा आणि गावोगावची जपलेली परंपरा.
एकीकडे तब्बल 720 कि.मी. लांबीचा अफाट समुद्रकिनारा आणि दुसरीकडे अभेद्य सह्याद्रीच्या कातळ डोंगररांगा, आणि यामध्यभागी वसलेलं कोकण. निसर्गाने भरभरून आपलं दान कोकणाच्या पदरात टाकले आहे आणि कोकणात फिरताना हे पदोपदी जाणवते.
कोकणात असणारा निसर्ग, नारळी-पोफळीच्या बागा, सुंदर चमचमणाऱया वाळूंचे समुद्रकिनारे, रौद्र सह्याद्रीचे कातळ कडे व त्यावरून कोसळणारे धबधबे, हिरव्यागार दऱया आणि शांत धीरगंभीर देवस्थानं आपल्याला खुणावत रहातात.
भौगोलिकदृष्ट्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग हे चार जिल्ह्यांचा मिळून कोकण विभाग बनलेला आहे. ठाण्यातील डहाणूपासून सुरू होणारा कोकण प्रदेश दक्षिणकडे गोव्यापर्यंत पसरला आहे. मागील 10 वर्षांपर्यंत कोकण तसा दुर्लक्षित राहीलेला भाग होता. मात्र येथील निसर्गाने पर्यटकांना भूरळ घातली आणि मागील दहा वर्षात कोकणाचा एक पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ लागला आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून सहजपणे येता येईल असे मार्ग, कोकण रेल्वे यामुळे येथे विकासाची गती वाढली आहे आणि येथील पर्यटनाचा व्यवसायही तेजीत आला आहे.
समुद्रकिनारा जवळ असल्याने कोकणातील वातावरण हे उष्ण आणि दमट स्वरूपाचे आहे. सर्वसाधारणतः 30 ते 37 से. एवढे तापमान येथे असते. येथील सर्व ऋतू हे येथे अनुभवण्यासारखेच आहेत.
हा सर्वात उष्ण काळ. मे महिन्यामध्ये 40 अंशांवर पारा चढतो आणि हवेतला दमटपणाही प्रचंड वाढलेला असतो.
300 ते 900 मी.मी. पर्जन्यमानामुळे कोकण सुंदर दिसतं, पण अतिवृष्टी, पूरस्थिती आणि समुद्राचं उधाण लक्षात घ्यावं.
दिवसा साधारण 20 ते 25 आणि रात्री 15 अंशांपर्यंत पारा राहतो. समुद्र शांत आणि हिरवळ फुललेली असते.
भटकंती म्हणजे फक्त फोटो काढणं नाही. लोक, भाषा, सण, जेवण आणि शेती यांच्यामुळेच ठिकाणाची खरी ओळख समोर येते.
कोकणात फार पुर्वीपासून राहणाऱया लोकांना कोकणी म्हटले जाते. कोकणातील लोकं मुळातच राहण्या-वागण्यात साधे आणि आपुलकी असणारे आहेत. आपल्या परंपरा जपणं आणि त्या आचरणात ठेवणं ह्याकडे ते कटाक्षानं लक्ष देतात.
कोकणात विविध सण हे त्या परंपरांना धरूनच साजरे केले जातात. यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखे सण म्हणजे शिमगा म्हणजेच होळी आणि गणेशोत्सव. कोकणामध्ये मराठी आणि मालवणी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात.
कोकणाची खाद्य संस्कृतीही वेगळी आहे. कोकणामध्ये मासे हे देखील खाद्यसंस्कृतीचाच एक भाग आहे. नारळ, लाल मिर्ची वाटून त्याच्या मसाल्याचा येथील जेवणामध्ये वापर केला जातो.
त्याचप्रमाणं कोकम म्हणजे आमसूल, कैरी, चिंच यांचाही जेवणामध्ये चवीसाठी उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील जेवणात आंबट, तिखट आणि नारळाचा खास समतोल जाणवतो.
परंपरा जपणं आणि त्या आचरणात ठेवणं याकडे इथले लोक कटाक्षाने लक्ष देतात. शिमगा आणि गणेशोत्सव विशेष उल्लेखनीय.
कोकणामध्ये मराठी आणि मालवणी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. कोंकणी आणि मालवणी या दोन्ही वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत.
मासे, नारळ, लाल मिरचीचा मसाला, कोकम, कैरी आणि चिंच यांच्या चवी कोकणच्या जेवणाला वेगळेपणा देतात.
भातशेती, नारळ, सुपारी, कोकम, काजू, जांभूळ, करवंद आणि देवगड-रत्नागिरीचा हापूस ही कोकणाची खास ओळख.
कोकणात पावसाचं प्रमाण प्रचंड असल्याने भातशेती हे येथील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात आढळणाऱया खरीप आणि रब्बी हंगामातील पीकेही येथे घेतली जातात. नारळ, सुपारी यांची शेती हा एक प्रमुख शेती व्यवसाय येथे आहे. याच्याबरोबरच कोकम, काजू यांची शेतीही येथे केली जाते. त्याच्या जोडीला जांभूळ, करवंद असा रानमेवाही येथे चाखायला मिळतो.
कोकणातील वातावरण रबरच्या झाडाच्या वाढीस पोषक असल्याने आता येथे अनेक कंपन्यांनी रबराच्या झाडांची लागवड सुरू केली आहे. मात्र, कोकणाची ओळख आहे ती त्याच्या खास हापूस आंब्यासाठी. देवगड, रत्नागिरी, रायगड अशा अनेक ठिकाणाचा हापूस आंबा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.
केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्र आणि इतर राज्यातील पर्यटन स्थळे देखील आम्ही असेच फिरत आहोत. त्यामुळे तुम्ही कोकणच नव्हे तर इतर ठिकाणांची माहितीसुद्धा आम्हाला कळवाल अशी अपेक्षा. आपलं लिखाणं, सूचना किंवा आपल्या व्यवसायाची माहिती द्यायची असेल तर आम्हाला मेल किंवा WhatsApp करू शकता.
किरकटवाडी, सिंहगड रस्ता, पुणे - ४११०२४, महाराष्ट्र
+91-7218567888, +91-9637589800, +91-9881098224, +91-7887377888
kokan.bhatkanti@gmail.com